मुंबई – गेल्या काही दिवसांपासून देशासह स्थानिक राज्यातील राजकारण चांगलाच तापलेलं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर बिहारच्या राजकारणात नितीशकुमार यांनी भाजपसोबत काडीमोड केला आणि राजदला सोबत घेतलं. त्यामुळे नितीशकुमार मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाल्याचे पाहायला मिळाले.
बिहारमध्ये बदललेल्या राजकारणानंतर एका मराठमोळ्या अभिनेत्याने खास शैलीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता तसेच दिग्दर्शक हेमंत ढोमेने एक ट्विट करत बिहारच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. यावेळी तेजस्वी यादव यांचं अभिनंदन करत हेमंत आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, “बिहारच्या आणि पर्यायाने आपल्या देशाच्या विकासात आपण मोलाचं योगदान द्याल अशी अपेक्षा आणि मनःपुर्वक शुभेच्छा !”
Congratulations to Young and Dynamic Leader of RJD Tejasvi Yadav Ji For Taking Oath As A Deputy Chief Minister of Bihar…
Wishing A Successful Tenure Ahead…बिहार च्या आणि पर्यायाने आपल्या देशाच्या विकासात आपण मोलाचं योगदान द्याल अशी अपेक्षा आणि मनःपुर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/6quH5Sx92F
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) August 10, 2022
मराठी अभिनेत्याने बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचं केलेलं अभिनंदन पाहून सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलय. बिनधास्त व्यक्त झालेल्या हेमंतचे यावेळी अनेकांनी कौतुक देखील केलंय. काही महिन्यांपूर्वीच हेमंतचा झिम्मा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला होता.