मुंबई- अभिनेत्री हेमांगी कवीचं स्वत:च्या घराचं स्वप्न पुर्ण झालं आहे. स्वप्न नगरीत म्हणजेच मुंबईत तिने दिवाळीत नव्या घरात प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर घराचा फोटो पोस्ट करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
मुंबई सारख्या ठिकाणी घर घेणं आमच्या सारख्यांना अशक्य आहे हे खूप आधीच आमच्या लक्षात आलं होतं. म्हणून मग ‘म्हाडा’ मध्ये सलग 8 वर्ष प्रयत्न केल्यावर एकदाची 2016 मध्ये मला lottery लागली आणि बोरीवलीत आम्हांला घर लाभलं. तोपर्यंत आम्ही भाडेतत्त्वावर कधी दादर तर कधी दहिसर मध्ये रहायलो.
पण प्रत्यक्षात घर हातात यायला नोव्हेंबर 2019 उजाडलं. Possession चे सर्व तांत्रिक सोपस्कार आटपून आणि आम्हांला हवी तशी सजावट करून घेऊन फेब्रुवारी मध्ये आम्ही आमच्या हक्काच्या घरात ‘गृहप्रवेश’ केला! , असं तिने इंस्टाग्रामवरील पोस्टवर लिहिलं आहे.
त्यावेळी आम्ही दोघे ही मालिकांमध्ये प्रचंड व्यस्त होतो आणि नंतर मार्च मध्ये कोरोनामुळे आम्ही गावी निघून गेलो. 4 महिने साताऱ्याला राहून आम्ही जून मध्ये आमच्या या नवीन घरात परतलो. पण मग जून पासूनच पुन्हा कामं सुरू झाली आणि आम्ही वेगवेगळ्या शहरात shooting साठी निघून गेलो. त्यामुळे खूप काळ आम्हांला आमच्या या नवीन घरात राहायलाच मिळालं नाही किंवा कुठलेच सण नीटसे साजरे करता आलेच नाहीत.
पण मग यावेळी मात्र काहीही झालं, कितीही busy असलो तरी ‘दिवाळी’ सुट्टी घेऊन आपल्या या पहिल्यावहिल्या, नवीन, हक्काच्या घरात साजरी करायचीच असं ठरवून टाकलं.
So, यंदाची आमची दिवाळी, आमचा पाडवा या नवीन, हक्काच्या घरात साजरा करतोय!
तुमचे आशीर्वाद असू द्यात!, या शब्दाच तिने आपल्या घराबद्दल असलेल्या भावना मोकळ्या केल्या आहे.