करोनामुळे दगावलेल्या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मदत

प्रत्येकी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत

पुणे – करोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 7 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठ निधीतून सरसकट दीड लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनने घेतला आहे. त्यामुळे करोनामुळे दगावलेल्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यात विद्यापीठात कार्यरत शिक्षकतेर कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.

या कर्मचाऱ्यांना विद्यापीठामार्फत आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टीने पूर्वीपासून विद्यापीठ पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू होती. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या निर्णयावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.

अखेर करोनामुळे मृत झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतल्याने शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे. यासंदर्भात कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.