नवी दिल्ली: मायक्रो ब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्कमध्ये कार्यरत असणारी कंपनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकरी जॅक डॉर्सी आपल्या एकूण संपत्तीमधील 28 टक्के वाटा (7500कोटी रुपये) कोरोनाशी लढण्यास दान करणार आहे, असल्याची घोषणा केली आहे. ही संपत्ती समाज कार्यासाठी देणार असल्याचेही डॉर्सी यांनी ट्विटवर पोस्ट करुन सांगितले आहे. डॉर्सीने “स्टार्ट स्मॉल फाउंडेशन’ला आपल्या संपत्तीमधील 7500 कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले आहे. हा संपूर्ण मदत निधी कसा खर्च करण्यात येणार आहे, याचीही माहिती डॉर्सीने सविस्तरपणे दिली आहे. शिक्षण व आरोग्य यावर हा खर्च करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
I’m moving $1B of my Square equity (~28% of my wealth) to #startsmall LLC to fund global COVID-19 relief. After we disarm this pandemic, the focus will shift to girl’s health and education, and UBI. It will operate transparently, all flows tracked here: https://t.co/hVkUczDQmz
— jack (@jack) April 7, 2020
दरम्यान, डॉर्सी यांच्या आधी कोरोनाशी लढण्यासाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी 227 कोटी. ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस 100 दशलक्ष डॉलर्स तर ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकरी टिम कुक यांनी काही कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ते इटलीला सर्व प्रकारची वैद्यकीय मदत करत आहेत.