विश्रांतवाडी : कोरोना विषाणूमुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व उत्सव,सण, जत्रा रद्द केल्या आहेत.
सध्याची परिस्थिती पाहता पुणे महापालिका वृक्ष संवर्धन समितीचे सभासद अरविंद गोरे यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा न करता गरजूना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले आहे. लॉकडाऊन काळात जीवाची पर्वा न करता सफाई कर्मचारी आपली सेवा देत आहेत.
या सफाई कर्मचाऱ्यांना गोरे यांनी जीवनाश्यक वस्तूची मदत केली आहे. गोरे यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल नागरिकांनी त्यांचे आहेत. आपण देखील शक्य होईल तेव्हडी मदत गरजूना करावी असे अवाहन गोरे यांनी केले.