पुणे – नागपंचमी सणाच्या निमित्ताने सहकारनगर भागातील शाहू वसाहत, अण्णा भाऊ साठे वसाहत आणि डॉ. आंबेडकर वसाहत येथे एक हजारांहून अधिक महिलांना नागपंचमीच्या सणानिमित्ताने आधार सेवा केंद्राच्या वतीने विशेष भेट देण्यात आली.
करोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या या महिलांना सण साजरा करण्यासाठी साडी, बांगड्यांचा सेट, हळदी-कुंकू, टिकली व मेंदीचा कोन भेट देण्यात आला. सेवा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हेमंत बागुल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला.
केंद्राचे संस्थापक बागुल म्हणाले, करोनामुळे सर्वांच्याच हालअपेष्टांमध्ये भर पडली. आर्थिक ओढाताणही झाली. अशा परिस्थितीत उत्साहाने सण साजरे करणं व त्यासाठी खर्च करणे अनेकांना शक्य होत नाही, हे लक्षात घेऊन या वस्तीतील माता-भगिनींच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, त्यांना आनंद व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
नागपंचमी हा प्रामुख्याने महिलांचा सण मानला जातो. म्हणूनच या सणाच्या निमित्ताने एक हजार महिलांना साडी व अन्य वस्तू देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
जय हनुमान मित्र मंडळचे अध्यक्ष त्रिंबक अवचिते, विनोद गायकवाड,अनिल साठे, सागर पुनवळे, सुनील अवचिते, विजय गायकवाड, सचिन अवचिते, भाऊ शिरसागर, दीपक गावडे, आनंद लोंढे, कुमार खटावकर, हबीब शेख, सुयोग धावडे, सचिन पवार, राम रणपिसे, रोहित शिंदे, राहुल जाधव, भरत तेलंग, तेजस बागुल, निखिल सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.