हृदयरोगी रुग्णांचे हृदय निरोगी होण्यास मदत- डॉ.प्रदीप मुरंबीकर

प्रिव्हेंटिव्ह कॉर्डिओलॉजी विभागाचे यश दिशादर्शक

नगर: आनंदऋषिजी हॉस्पिटलचे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचे हे यश दिशादर्शक असुन पहिल्या बॅचच्या हृदयरोगी रूग्णांमध्ये झालेले हे सकारात्मक परिवर्तन समाजाचे कल्याण करणारे आहे. राजयोगा मेडिटेशनमुळे अनेक शारिरीक व मानसिक बदल होतात. या जीवन पध्दतीमुळे खराब झालेल्या पेशीही परत कार्यरत होतात असे संशोधन सांगते. त्यामुळे हृदयरोगी रूग्णांचे हृदय निरोगी होण्यास मदत झाली आहे. सदर कोर्स मोफत घेतला जातो त्यामुळे समाजातील तळागाळातील व्यक्तींनाही लाभ घेता येणार आहे. मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप मुरंबीकर यांनी केले.

डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या की भारत सरकारचा आरोग्य विभाग व ब्रह्माकुमारीजचे माऊंटअबु येथील ग्लोबल हॉस्पिटलद्वारा सदर विषयावरील रिसर्च पुर्ण झाला. थोर शास्त्रज्ञ व भारताचे तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे या संशोधनाला मार्गदर्शन लाभले. संशोधनाच्या टीममध्ये प्रमुख असणारे हृदयरोगतज्ञ डॉ. सतीश गुप्ता यांच्या हस्ते आनंदऋषीजी हॉस्पिटल येथील प्रिव्हेंटीव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचे उदघाटन झाले. या कोर्स मध्ये मानसिक प्रदुषणावर मात करण्यासाठी राजयोगा मेडिटेशन जीवनपध्दती शिकविली जाते व त्यासोबतच शुध्द सात्विक आहार व यथायोग्य व्यायाम याची जोड दिली जाते. या त्रिसुत्री कोर्सचा परिणाम पहिल्या तीन महिन्यानंतर दिसुन यायला सुरूवात होतो व जशी जशी आपली जीवनपध्दती सकारात्मक होत जाते तस तसा शरीरावर व मनावरही सकारात्मक बदल होत जातो.

डॉ. वसंत कटारिया व डॉ. राहुल अग्रवाल (कार्डिओलॉजीस्ट) यांनी या सर्व हृदयरोगी पेशंटची तपासणी केली. कोर्स सुरू होण्यापुर्वीचे रिपोर्ट व कोर्स झाल्यानंतरचे रिपोर्ट याचा तुलनात्मक वैज्ञानिक अभ्यास केला. डॉ. वसंत कटारिया यांनी झालेला सकारात्मक बदल स्लाईड शो द्वारे सर्वांसमोर सादर केला. प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंट द्वारा हृदयरोग असणाऱ्या रूग्णांसाठी स्पेशल कोर्सेस घेतले जातात. त्यात पहिल्या बॅचमध्ये दाखल झालेल्या हृदयरोगी रूग्णांमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसून आले आहेत व आश्‍चर्यकारकरित्या ब्लॉक झालेल्या हृदयाच्या रक्तवाहिन्या मोकळया होऊन त्यांच्या हृदयाची पंपींग क्षमताही वाढली आहे असे प्रतिपादन डॉ. वसंत कटारिया यांनी केले. प्रमोद गांधी,राजेश बागडे, दत्तात्रय डहाळे यांनीे स्वानुभव कथन केले.

शेवटी डॉ. प्रकाश कांकरिया यांनी आभार मानले ते म्हणाले की उच्चरक्तदाब, मधुमेह, ताणतणाव, डिप्रेशन, लठ्ठपणा, रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण, अनुवांशीकता, सिगारेट सारख्या वाईट सवयी यामुळे हृदयरोग होण्याचे प्रमाण दिवसें दिवस वाढत चालले आहे. या सर्वांनी कोर्सचा जरूर लाभ घ्यावा व हृदयरोगापासुन स्वत: चा बचाव करावा.हा कोर्स मोफत असुन पुढील बॅच 11 एप्रिल पासून आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटर, ब्लड बॅंकेच्या बेसमेंट येथे रोज सकाळी 7 ते 8.30 या वेळेत होईल. नावनोंदणीसाठी प्रिया दिदी, दत्तात्रय वाडकर यांच्याकडे संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.