मांजरी (पुणे) : कोकणवासीय पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीने मांजरी परिसरात ‘अजिंक्य सेतू’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला मांजरी बुद्रुक आणि परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत सुमारे 15 लाख रूपयांच्या जीवनावश्यक साहित्याची मदत केली आहे.
या बाबत शारदा सोशल फौंडेशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अजित घुले यांनी आवाहन केले होते. नुकतीच ही मदत कार्यकर्त्यांनी चिपळून परिसरातील गरजूंना पोहचवली आहे. 50 कार्यकर्त्यांनी तीन दिवस पूरग्रस्त भागातील घराघरात ही मदत पोहचवली.
दरम्यान, ही मदत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, आमदार चेतन तुपे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, जितीन कांबळे, रविंद्र गोगावले, निलेश घुले, सुधीर घुले, सचिन टकले, मंगेश मोरे, संजय घुले, अभिजित घुले यांच्या उपस्थितीत चिपळूनकडे पाठवली.