नगर (प्रतिनिधी) – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसाठी सॉनिटायझरचे पाठवले आहेत. आज आम्ही त्याचे वाटप मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके व एसटी डेपो येथील अधिकारी यांच्या सुपूर्त केले आहे. नागरिकांना आवश्क असणारी सेवा महाराष्ट्रात शिवसेना कायम देते. असे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सांग़ितले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मार्फत नगरमध्ये आलेले सॉनिटायझर महापालिकेत आयुक्त श्रीकांत मायकलवारकडे सुपूर्त करतांना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, परेश लोखंडे, माजी महापौर अभिषेक कळमकर, युवासेना जिल्हाअध्यक्ष रवी वाकळे, मनिष गुगळे, विशाल वालकर, डॉ.बोरगे, गिरीष शर्मा, दत्तात्रय नागापुरे, महेश देशपांडे आदी उपस्थित होते.
राठोड पुढे म्हणाले की, राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर सर्वसामान्य लोकांसाठी शिवभोजन सुरु केले. या लॉकडाऊन मध्ये अनेक नागरिक शिवभोजनामुळे तारले गेले आहेत. सर्वसामान्यला दिलासा देण्याचे काम ठाकरे व त्याच्या मंत्र्यांनी हातात घेतलेले आहे. शिवभोजन बद्दल कोणतीही तक्रार असेल तर ती तुम्ही माझाकडे किवा जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखाकडे मांडू शकता.
————–