#व्हिडीओ : बकरी ईदचा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने पुराचा तांडव केला. शहरासह जिल्ह्यातील तब्बल 200 पेक्षा अधिक गावांना महापूराचा मोठा फटका बसला आहे. शिरोळ तालुक्‍यात अजूनही पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य सुरू आहे.

पुराची भयंकर परिस्थिती पाहून जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने आज साजरी करण्यात येणारी बकरी ईद अतिशय साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बकरी ईद ला केल्या जाणाऱ्या खर्चाला फाटा देऊन जमा होणारी रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम समाजाच्या या कुर्बानीची चर्चा मात्र सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.

1 Comment
  1. दीपक says

    कुर्बानी का सही मतलब समझा इन भाइयों ने

Leave A Reply

Your email address will not be published.