बारामती : येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, तारांगण महिला वसतिगृह, टीसी कॉलेज मुलींचे वसतिगृह, राजमाता अहिल्यादेवी होळकर वस्तीगृह, रयत भवन, विद्या प्रतिष्ठान मुलांचे व मुलींचे वसतीगृह या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकरिता कोविड केअर सेंटर चालविले जात आहे.
यामध्ये प्रामुख्याने तेथील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती साफसफाई रहावी याकरिता आवश्यक असणारे डस्टबिन बॉक्स, बादल्या, मग, सॅनिटायगर, फिनेल, कोविड केअर सेंटर रोज निर्जंतुकीकरण करण्याकरता लागणारे मोठे स्प्रे पंप, खराटा, झाडू अशा विविध आवश्यक वस्तू,सर्व कोविड सेन्टर ला बेडशीट पाण्याचे जार असे दोन लाख रुपये किंमतीची उपयोगी वस्तू श्री रवींद्र आबा काळे यांनी नटराज नाट्य कला मंडळाच्या अध्यक्ष किरण दादा गुजर यांच्याकडे सुपूर्त केल्या.
सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये संपूर्ण जग अतिशय कठीण प्रसंगातून जात आहे. अशावेळी माणुसकीच्या भावनेतून गेली एक वर्ष नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने किरण दादा गुजर व त्यांची संपूर्ण टीम जे कार्य करीत आहे. त्या कार्यामध्ये आपणही सहभागी असावे या जाणिवेतून रवींद्र आबा काळे यांनी नेमकी गरज ओळखून ही मदत दिली आहे. याबद्दल नटराज नाट्य कला मंडळाच्या अध्यक्ष किरण दादा गुजर यांनी आभार व्यक्त केले.