सातारा -लॉकडाऊनच्या काळात परराज्यातून येथे अडकलेल्या गरजूंना येथील गुरूवार पेठेतील श्रीकांत शेटे परिवाराच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. परराज्यातील कामगार व मजूर लॉकडाऊनमुळे येथे अडकल्याने त्यांना येथील एका महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. या लोकांना अन्नधान्य तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंसाठी समाजातून मदत करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते.
त्यानुसार श्रीकांत शेटे व परिवाराच्या वतीने बिस्किटे, नॅपकिन्स, बेडशीटस् अशा विविध वस्तूंची मदत करण्यात आली. सातारा तालुक्याच्या तहसीदार आशा होळकर यांच्याकडे या परिवाराने ही मदत सुपूर्द केली. श्री. शेटे येथील प्रकाश मंडळाचे कुटुंबप्रमुक आहेत. या मंडळाने सामाजिक बांधिलकी जापोसत आतापर्यंत अनेकविध उपक्रम राबविले आहेत. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही मदतीची भूमिका वेळोवेळी घेतली आहे.