सणबूर – पाटण तालुक्यातील पूरग्रस्तांना पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांचेकडून मदतीचा हात देण्यात आला. त्यांच्या वतीने ब्लॅंकेटचे वाटप आ. शंभुराज देसाई यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. आ. देसाई यांनी पालकमंत्र्यांच्या उपक्रमाबाबत आभार मानले.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, नगरसेविका मनिषा जंगम, बबनराव माळी, नानासो पवार, कारखान्याचे संचालक बाळासाहेब शेजवळ, पाटण शिवसेना शहरप्रमुख शंकर कुंभार त्याचबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटण शहरात तसेच मतदारसंघात गेले पाच ते सहा दिवस महापुराने तांडव केले होते. या पूरपरिस्थितीत पाटण तालुक्यातील नुकसानीची तसेच बाधितांना द्यावयाच्या मदतीची विचारणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांचेकडून रोज करण्यात येत होती. तसेच पूरग्रस्तांच्या मदतीकरीता प्रशासन विभागाने सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी वेळोवेळी केल्याने तालुक्यातील परिस्थिती योग्यरित्यिा हाताळली गेली. पूरपरिस्थितीत पालकमंत्री यांचे चांगले सहकार्य आम्हास मिळाले असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर या पुरात तसेच अतिवृष्टीत बाधित झालेल्या कुटुंबियांना बॅंल्केटच्या रुपाने केलेल्या मदतीबाबत तालुक्याच्यावतीने आभार मानले.