महाबळेश्वर- मुसळधार पावसामुळे फलटण तालुक्यातील गोखळी, आसू येथील साठहून अधिक ग्रामस्थ पुरात अडकले होते. या अडकलेल्या नागरिकांना महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी पुरातून सुरक्षित बाहेर काढले.
सातारा जिल्हात सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये धुवॉंधार पावसात फलटण येथील गोखळी, आसू येथे पुरामध्ये अडकलेल्या साठहुन अधिक नागरिकांची सुटका केली. यामध्ये लहान बालकांसह महिला वृद्धांचा सहभाग असल्याची माहिती महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी मिळाली होती.
या माहितीच्या आधारे मंगळवारी सकाळी महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम महाबळेश्वरमधून रवाना झाली होती. फलटण मधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर ही टीम सायंकाळी कराडकडे रवाना झाली.