पिंपळे सौदागर – वाढदिवस साधेपणाने साजरा करत भेटवस्तू न स्वीकारता पूरग्रस्त भागातील नागरिकांना उपयोगी पडतील अशा वस्तू वाढदिवसाची भेट स्वरूपात आणाव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी केले होते.
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत मदत केली. नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांसोबत पूरग्रस्त नागरिकांसाठी भेट देत संपूर्ण मदत साहित्य पोहच केले. सांगली येथे जयंत पाटील यांच्या पत्नी शैलैजादेवी पाटील आणि चिरंजीव प्रतीक पाटील यांची भेट घेऊन सांगली पूरग्रस्त भागातील समस्या जाणून घेतल्या.