महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम
जामखेड (प्रतिनिधी) – पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष करणारा राज्यातील सर्वात मोठा पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जामखेड येथील पत्रकारांना हेल्मेट व संघाचे ओळखपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन दि २५ रोजी करण्यात आले असल्याची माहिती संघाचे जिल्हाउपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश अध्यक्ष राजा माने, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने पत्रकारांना राज्यभर हेल्मेट वाटप करण्याचा अभिनव अभियान पत्रकार संघ राबवित आहे. त्याच अनुषंगाने जामखेड तालुक्यातील पत्रकार संघाचे सभासद असलेल्या पत्रकार बांधवाना हेल्मेट व ओळखपत्र वाटप करण्याचे आयोजन दि. २५ रोजी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह नगर रोड जामखेड येथे करण्यात आले आहे.
यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, तालुकाध्यक्ष वसंत सानप यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सभासद उपस्थित राहणार आहेत.