हेलिकॉप्टर दुर्घटना; केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद थोडक्‍यात बचावले

पाटणा – केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आज एका दुर्घटनेतून थोडक्‍यात बचावले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या दरम्यान पाटणा एअरपोर्टवर त्यांचे हेलिकॉप्टर तारेला धडकले. ज्यामुळे हेलिकॉप्टरचे ब्लेड तुटले. या दुर्घटनेच्यावेळी मंगल पांडेय आणि संजय झा त्यांच्यासोबत होते.

पाटणा एअरपोर्टजवळ बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी ओव्हरहेड वायरला हेलिकॉप्टरचे पंखा लागला.त्यामुळे हेलिकॉप्टरचे ब्लेड तुटले. या दुर्घटनेत रविशंकर प्रसाद सुदैवाने बचावले. त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.

ही दुर्घटना आज संध्याकाळी घडली. रविशंकर प्रसाद निवडणूक प्रचार संपवून पाटण्याला परतले होते. हेलिकॉप्टरच्या लॅंडिंगच्यावेळी पंखा तारेला धडकला. हेलिकॉप्टरचे दोन ते तीन ब्लेड तुटले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये रविशंकर प्रसाद, बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय आणि बिहारचे जल सिंचन मंत्री संजय झा उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.