कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षपदी विश्‍वेश्‍वरा हेगडे कागेरी यांची निवड

बंगळुरू : कर्नाटकात येडियुरप्पा यांनी नुकतेच विश्‍वासदर्शक ठराव मंजूर करून सत्ता स्थापण केली आहे. येडियुरप्पा मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांच्या जागेवर भाजपचे विश्‍वेश्‍वरा हेगडे कागेरी विराजमान झाले आहेत.

विश्‍वेश्‍वरा हेगडे 6 वेळा आमदार म्हणून निवडूण आले आहेत तसेच माजी शिक्षणमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. अभाविपचे सदस्य म्हणून हेगडे यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात केली होती. 1994 मध्ये पहिल्यांदा अंकोलाचे आमदार म्हणून निवडुण आले होते. 1994 ते 2008 पर्यंत ते या जागेवरून निवडुन आले होते परंतु, 2008 नंतर त्यांनी सिरसीमधून 2018पर्यंत निवडणुक लढविली आणि जिंकलीसुद्धा. दरम्यान, आता पक्षाकडून त्यांना मोठी जबाबदारी सोपविली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)