Heena Gavit resigns BJP । विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. नंदुरबारमध्ये भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित पक्षाचा राजीनामा देत पक्षाला झटका दिला आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत असल्याचे हॆ गावित यांनी म्हटले आहे.
मी ही निवडणूक जिंकणार Heena Gavit resigns BJP ।
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून डॉ. हीना गावित अपक्ष निवडणूक लढवत आहेत. अक्कलकुवा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी त्या आग्रही होत्या. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिंदे गट विरोधात काम करत असल्यामुळे मी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मी खासदार असताना अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघात अनेक विकासाचे कामे केलेले आहेत. मी केलेल्या विकास कामांचा फायदा मला मतदार मतदानाच्या स्वरूपात देणार, मी निवडणूक लढत जिंकणार आहे, असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
भाजपला नंदुरबारमध्ये मोठा धक्का Heena Gavit resigns BJP ।
आता डॉ. हिना गावित यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे. शिंदे गट वारंवार भाजपाच्या विरोधात काम करत असल्यामुळे मी शिंदे गटाच्या विरोधात उमेदवारी करत आहे, असे हिना गावित यांनी सांगितले आहे. हिना गावित यांनी भाजपला रामराम ठोकल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला नंदुरबारमध्ये मोठा धक्का बसलाय.
दरम्यान, हीना गावित यांचा जन्म 28 जून 1987 रोजी नंदूरबार येथे झाला. त्या डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या आहेत. त्या पेशाने डॉक्टर आहेत, त्यांनी एमबीबीएस आणि एमडीची पदवी घेतली होती. हीना गावित या 2014 साली लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेल्या होत्या. त्या लोकसभेवर निवडून गेलेल्या सर्वाधिक तरुण खासदार ठरल्या होत्या. त्यावेळी हीना गावित या 26 वर्षांच्या होत्या. हीना गावित यांनी पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामगिरीने छाप पाडली होती. पंतप्रधान मोदी यांनीही हीना गावित यांचे कौतुक केले होते. 2019 मध्येही हीना गावित लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या.