ठराविक वेळेसाठीच घेतला निर्णय
शिक्रापूर -पुणे नगर महामार्गावर वाघोली ते शिक्रापूर या ठिकाणी होणारी वाहतूककोंडी प्रशासनाची डोकेदुखी बनत असून, अनेकदा नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे; परंतु सदर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनकडून विविध उपाययोजना करण्यात येत असताना आता पुणे-नगर महामार्गावर ठराविक वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण चौक, तसेच पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा, सणसवाडी आणि शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील करंदी फाटा येथे नेहमीच वाहतूककोंडी होत असल्यामुळे स्थानिकांसह रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकांना देखील वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.
यापूर्वी शिक्रापूर, जातेगाव, करंदी, कासारी येथील ग्रामपंचायतींनी पत्राद्वारे पुणे-नगर, तसेच शिक्रापूर-चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी केलेली होती. त्या पत्रानुसार जिल्हा अधिकारी नवलकिशोर राम यांनी मोटार वाहन कायदा 1988 च्या कलमान्वये पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा ते कोंढापुरी, तसेच शिक्रापूर-चाकण रस्त्यावर शिक्रापूर ते वाजेवाडी-चौफुला या दरम्यान अवजड वाहनांना बंदी घातली आहे.
त्या आदेशावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, तर याबाबत नुकतेच पुणे-नगर महामार्ग वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप येळे, अक्षय सुपे, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र मदने यांनी पुणे-नगर महामार्गावर ठिकठिकाणी फलक लावले आहे,