पुणे – खडकवासला धरणातून पाणी न सोडताही बुधवारी रात्री शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे भिडे पूल पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळाले. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास भिडे पुलावरून पाणी वाहू लागले होते. तसेच नदीकाठच्या रस्त्यावर सुध्दा पाणी आले होते.
शहरात बुधवारी रात्री जोरदार पाऊस पड्ला. दुपारपासून सायंकाळपर्यंत संततधार असलेला पावसाने रात्री जोर वाढविला. अवघ्या दोन तासात पावसाने शहरातील सर्व रस्ते जलमय करून टाकले.
मध्यवस्तीमधील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. तसेच आंबिल ओढयातूनही मोठ्या प्रमाणात पाणी होते. तसेच इतर भागातून येणारे पाणी नदीमध्ये येत होते. त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढली तसेच नदीचा प्रवाह वेगाने वाहू लागला. पर्यायाने भिडे पुलावरून पाणी वाहू लागले होते.