मुंबईला पावसाने झोडपले: शाळांना सुटी जाहीर

मुंबई – मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तसेच जोरदार पावसामुळे मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या २४ तासात मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गेल्या २४ तासांपासून मुंबई, ठाणे, नवी आणि रायगडमध्ये पावसाने तुफान फटकेबाजी केली आहे. विशेषत: मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून, येथे १३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच पावसामुळे मुंबर्ईच्या दिशेने एकही लोकल रवाना होणार नसल्याची घोषणा ठाणे रेल्वे स्थानकावर करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.