मुंबईत मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. ठाणे, नवी मुंबईसह परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे आणि परिणामी वाहतूकीचा खोळंबा होत आहे.

पहाटेपासून सुरु झालेल्या संततधारेमुळे सायन, दादर, माटुंगा, वडाळा,अंधेरी, कुर्ला, कांदीवली, जेव्हीएलआर परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरात वाहतूकीवर मोठा परिणाम होत आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे आपल्या परिसरातील पावसाची परिस्थिती पाहून मुख्याध्यपकांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा असे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.