बि. के. बी. एन रस्त्यावरील पूल पाण्याखाली
निमसाखर – वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्टयात पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने परीसरातील ओढे नाले दुधडी भरुन वाहू लागले आहेत.
निमसाखर येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील निमसाखर कळंबला जोडणाऱ्या बि. के. बी. एन रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. तर झालेल्या पावसामुळे खंडोबानगर परीसरातील नालाबंडीग ही वाहून गेल्या आहेत. तर शेत पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऊस, कडवळ, मका, कांदा यासह फळबागांमध्ये पाणी साठल्याने पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. तर बऱ्याच ठिकाणी शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असून अगोदरच अडचणीत सापडलेला शेतकरी अजूनच संकटात सापडला आहे.
निमसाखरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, शेतपिकांसह नागरिकांच्या घरातही पावसाचे पाणी गेल्याने काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
निमसाखरमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उभ्या पिकात पूर्णपणे पाणी झाले. यामुळे पिकांसोबतच फळबागांचेही नुकसान झाले आहे. तर घरातही पाणी गेल्यामुळे धान्य भिजून नुकसान झाले आहे.
– गणेश सातपुते, शेतकरी