पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहरात शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये पुण्यातील शनिवारवाड्याजवळ, येरवडा कारागृहाजवळील तर पोलिस आयुक्त कार्यालयात आणि शिवाजीनगर पोलिस लाईन येथील बी आणि सी इमारतीजवळ झाड पडण्याच्या घटना घडल्या.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1202566743416362/
सध्या शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्याने रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणतीही जिवितहानीची घटना समोर आलेली नाही.
तसेच संचेती चौकातील भुयारी मार्गावरील दिशादर्शक लोखंडी कमान पडल्याची घटना देखील घडली आहे. याघटनेत देखील कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र शिवाजीनगरला जाणारे रस्ते बंद झाले आहेत. लाॅकडाऊन मुळे रस्त्यावर वर्दळ नसल्याने मंगळवार पेठेसारखी मोठी दुर्घटना टळली आहे.
पावसामुळे येरवडा कारागृहातील ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेला वृक्ष उन्मळून पडला.
पावसामुळे शिवाजी नगर पोलिस लाईन बी आणि सी बिल्डिंग येथील झाड पडले.
पावसामुळे पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आवारातील झाड देखील पडले.