पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची जोरदार हजेरी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि उपनगरांत शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार पाऊस झाला. काल पहाटेपासून भोसरी, आकुर्डी, निगडी, सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी आदी भागात जोरदार पाऊस झाला. दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे चाकरमान्यांची, विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. संततधार पावसामुळे बाजारपेठा ओस पडल्या होत्या.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्‌डे चुकविताना कसरत करावी लागत होती. याशिवाय शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्यांचे स्वरुप आले होते. पावसाचे पाणी साचून रस्त्यावरील खड्‌डेच खड्‌डे चोहीकडे असे चित्र पाहवयास मिळाले. पावसामुळे रस्ते अनेक चौकांमध्ये दुचाकीस्वारांची घसरगुंडी पाहवयास मिळाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.