येत्या दोन दिवसात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : मुंबई आणि उपनगरात पाऊस थांबण्याचे काही नाव घेत नाही. त्यातच आता समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या हवेमुळे शनिवारी आणि रविवारी मुंबईसह किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मान्सून मिशन मॉडेलच्या अंदाजानुसार पावसाळाच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये देशात 99 टक्के पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. मॉडेल एरर 8 टक्के दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे दोन महिन्यांत पाऊसमान हे सर्वसाधारण राहण्याची शक्‍यता 45 टक्के इतकी आहे देशात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 49 टक्के पाऊस पडतो यापूर्वी हवामान विभागाने जून ते सप्टेंबर दरम्यान 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज दिला होता. मान्सून मिशन प्रोजक्‍टनुसार ही परिस्थिती संपूर्ण मान्सून काळात कायम राहणार आहे त्याचबरोबर भारतीय महासागरात अनुकुल स्थिती राहील, त्यामुळे देशात इथूनपुढचे दोन महिनेही चांगला पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.