ओडिशात येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा

भुवनेश्वर – येत्या २४ तासांमध्ये ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तर किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

हवामान खात्याचे संचालक बिस्वास यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ” राज्यातील उत्तर आणि दक्षिणेतील काही जिल्ह्यांमध्ये येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. यापैकी काही जिल्ह्यांना आम्ही ” रेड अलर्ट” जारी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामध्ये शोनपूर, शामलपूर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. यासोबतच काही भागांमध्ये २४ तासांनंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. ”

 

Leave A Reply

Your email address will not be published.