Heavy rain in Pune । पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला.तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, मागच्या २४ तासात पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. यामध्ये जिल्ह्यात लवासा भागात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आली आहे.
या पावसाच्या नोंदी पुणे हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जाणून घेऊ कुठे किती पावसाची नोंद झाली.
पुणे विभाग पाऊस(मिमी)
लवासा ४५३.५
लोणावळा 322.5
निमगिरी 232.5
मालिन 180.5
चिंचवड 175.0
तळेगाव 167.5
NDA 167.5
लावले 166.5
वडगावशेरी 140.5
पाषाण 117.2
शिवाजीनगर 114.1
हडपसर 108.0
दापोडी 102.0
धामधरे 94.0
खेड 93.0
राजगुरुनगर 88.5
हवेली 82.0
नारायणगाव 81.0
मगरपट्टा 69.0
दौंड 40.0
पुरंदर 31.0