चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी; ६०० जनावरे वाहून गेली; १० लोकांच्या मृत्यूची शक्यता

जळगाव – मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून याचा मोठा फटका जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला बसला आहे. चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी झाली असून यामध्ये जवळपास ५०० ते ६०० जनावरे वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही लोक वाहून गेल्याची देखील माहिती मिळत आहे.

पावसामुळे तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वृृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. असून एका वृत्तवाहिनीला आमदार मंगेश चव्हाण यांनी सुद्दा माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘एसडीआरएफ’चे पथक बचावकार्यासाठी रवाना झाले आहे.

आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, स्थानिक लोकांशी माझं बोलणं झाल आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आम्ही घाटात आहोत. या ठीकाणी मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे. ५०० ते ६०० गुरं पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. तर काही दगावली आहेत. तसेच सकाळपासून ३ ते ४ मृतदेह मी बघितले आहेत. त्यामुळे ८ ते १० लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.