कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, आजरासह चंदगडमध्ये धुवांधर पाऊस

कोल्हापूर – राज्यात वरुणराजाने सर्वच ठिकाणी हजेरी लावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, आजरा आणि चंदगडमध्ये धुवांवर पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.

सततच्या पावसामुळे कोल्हापूरमधील राधानगरी धरण देखील 39 टक्के भरल आहे तर जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीच्या पातळीत देखील वाढली असून 23 फुटांवर आली आहे. तसेच वेदगंगा, पंचगंगा आणि भोगावती नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात शहरात पावसाची उघडझाप असली तरी ग्रामीण भागात मात्र सर्वत्र धुवांधार पाऊस पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.