पावसामुळे नदीचा बंधारा फुटला; शेतकऱ्यांकडून दुरूस्तीची मागणी

केंदूर –  करंदी आणि केंदूर परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने करंदीच्या उत्तर भागात असलेल्या चार पैकी तीन नाले फुटून शेतकर्‍यांच्या शेतात पाणी गेले आहे. त्याचबोबर वेळ नदीला पुर आल्याने बंधारा फुटला आणि बंधाऱ्याचे दरवाजे वाहून गेले आहे.

दोन दिवसांपूर्वी संपूर्ण पुणे जिल्ह्यात धुवाधार पाऊस बरसला त्यामुळे शिरुरच्या पश्‍चिम भागात देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये करंदी येथील आणि कें दूरच्या जवळ असलेल्या चार नाल्यांचे पैकी तीन आले फुटून नाल्यात मधील सगळे पाणी वाहून गेले आहे.

त्यामुळे वाहून गेलेले पाणी अनेकांच्या शेतात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर करंदी ते धामारी रोड पाण्याखाली गेल्यामुळे रस्त्याचा संपूर्ण मुरूम वाहून गेला रस्त्यात ओढा निर्माण झाला त्यामुळे दरेकर वस्ती पऱ्हाड वस्ती या दोन वस्त्यांचा करंदी गावाशी संपर्क तुटला.

दरम्यान स्थानिक युवकांनी पुढाकार घेऊन रस्ता आणि तीन पैकी एका नाल्याची तात्पुरती जेसीबीच्या साह्याने डागडुजी केली केली परंतु उर्वरित दोन नाल्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे या तीनही नाल्यांमधील पाणी वाहून गेल्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे दरवर्षी किमान मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत नाल्यांमध्ये पाणी साचून राहते परंतु यावर्षी नाल्याला भगदाड पडून संपूर्ण पाणी वाहून गेल्यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी या रस्त्याची आणि या नाल्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.