वादळी पावसाची इंदापुरात जोरदार हजेरी

कळस – तालुक्‍यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली आहे. इंदापूर तालुक्‍यात शनिवारी आणि रविवारी वादळी वाऱ्यांसह पावसाने अक्षरश झोडपून काढले. त्यामुळे तलाव, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

काही दिवसांपूर्वी ऑक्‍टोबर हीट वाढल्याने वातावरणात सकाळपासून उकाड्यात वाढ होत होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू झाल्याने काही भागांत हवामान ढगाळ होते. सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता. अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

कळस, गोसावीवाडी, पिलेवाडी, बागवाडी परिसरात पावसाला सुरुवात झाली. दुसरीकडे भिगवण, भादलवाडी, डाळज, काळेवाडी, पळसदेव परिसरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.