चांदोलीत अतिवृष्टी; चोवीस तासात धरणक्षेत्रात ८८ मिलीमीटर पावसाची नोंद

शिराळा (प्रतिनिधी) :पावसाचे आगर म्हणुन संबोधल्या जाणार्‍या चांदोली परीसरात गेल्या चार पाच दिवसापासुन अतिवृष्टी होत आहे.गेल्या चोवीस तासात चांदोली धरणक्षेत्रात ८८ मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद येथील पर्जन्य मापन केंद्रावर झाली आहे मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

चांदोली धरणाच्या सांडव्यातुन व वीजगृहातुन वारणानदी पात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग स्थीर ठेवण्यात आला असुन सध्या धरणाच्या सांडव्यातुन ३००० क्युसेक्स तर वीजगृहातुन १४०० असे एकुण ४४०० क्युसेक्स पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात येत होता तो वाढवल्याने ५१०० क्युसेक्स करण्यात आला असुन नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

काल सकाळ पासुन पावसाचा जोर मंदावला असला तरी ही काल पहाटे पर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर माथ्यावरील ओढे नाले तुडुंब भरुन वहात आहेत त्याचे पाणी वारणा नदीत येत असल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असुन काही ठिकाणी वारणा नदीचे पाणी ऊस,व भात शेती मध्ये शिरले आहे.याच बरोबर कोकरुड-रेठरे दरम्यान वारणा नदीवर असणारा बंधारा पुल गेल्या तीन दिवसां पासुन पाण्याखाली गेला आहे.

चांदोली धरणक्षेत्रात धुवाॅॅधार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ होत आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत चांदोली धरणात ८२२.६४५ द ल घ मी म्हणजेच २९.०५ टि.एम.सी पाणी साठा होता त्याची टक्केवारी ८४.४४ इतकी होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.