बारामती तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी

मोरगाव – बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात आज दिवसभराच्या उकाड्यानंतर पावसास सुरवात झाली आहे.  मोरगांव, तरडोली, सुपा, बाबुर्डी, माळवाडी, देऊळ्गाव रसाळ  येथे  मध्यम  ते  मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

सलग आठ दिवस तालुक्याच्या पश्चिम भागात ढगाळ वातावरणामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. दिवसभराच्या उकाडानंतर आज सायं साडेसात वाजण्याच्या सुमारास मोरगाव, तरडोली, बाबुर्डी,   काऱ्हाटी , देऊळगाव रसाळ आदी परीसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. पाऊस सुरु होताच विजपुरवठा खंडीत करण्यात आला. तरडोली येथे सलग दोन दिवस रात्रीची विज गायब झाली असल्याने ग्रामस्थांकडून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सुमारे अर्धा तास विजांचा कडकडाट सुरु होता. यानंतर पाऊस व  विजांचा कडकडाट कमी झाला. शेतातील ऊस, भूईमुग  या पिकांना  पावसाच्या पाण्याने  थोडा आधार मिळणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.