औरंगाबाद शहराला ढगफुटी पावसाने झोडपले

ढगफूटी पेक्षा जास्त वेगाने पावसाला सुरुवात

औरंगाबाद –  औरंगाबाद शहरावर आज (दि.9) सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहराला झोडपले.  ढगफूटी पेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. सुरुवातीच्या तीस मिनीटाच्या काळात पाऊस पड़ण्याचा  सरासरी वेग हा 166.75 मीमी  नोंदला गेला.

या तीस मिनिटांच्या कालावधीत 56.2 मीमी पावसाची नोंद झाली. म्हणजेच  औरंगाबाद शहरावर ढगफुटी पेक्षा वेगाने पाऊस पडला.  (ताशी शंभर मी. मी. किंवा जास्त पाऊस झाल्यास ढगफुटी म्हंटली जाते).

रात्री आठ वाजताच्या सुमारास पावसाच वेग थोडा कमी होत गेला. पावणेसात वाजेपर्यंत सरासरी 86.9 मी मी वेग होता व नंतर सव्वा आठपर्यंत तो कमी होत 53.24 मीमी प्रति तास पावसाचा वेग राहिला. एका तासात  87.6  मी. मी.  पावसाची औरंगाबाद शहरात नोंद झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.