राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई – राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन केलं आहे. मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर राज्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर असलेलं दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. आता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने पाऊस येत्या चार दिवसात जोर पकडण्याचा अंदाज आहे.  


हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे.  यामध्ये  नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढचे चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, रायगड, पुणे आणि साताऱ्यात येत्या तीन तासात मध्यम ते अती मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार 30 जुलै रोजी राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. 1 ऑगस्टला केवळ रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना पावासाचा अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.