बुलडाणा – राज्यात मान्सून अनेक ठिकाणी सक्रिय झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नद्या नाले तुडंब भरले असून वाहायला लागले आहेत. दरम्यान विदर्भातही जोरदार पाऊस झाला असून येथील नद्यांना पुर आल्याचे बघायला मिळाले आहे. पावसामुळे सिंदखेडराजा येथील कोराडी नदीला पुर आल्याने रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे.
https://fb.watch/6dnckHK3HA/
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यावेळी कोराडी नदीला पुर आल्याने रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. सवडत ते गजरखेड़ रस्त्यावरील हा पूल असून यामुळे चार गावांचा संपर्क तुटला आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस व त्यामुळे नदीला पुर आल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे.