श्रीगोंद्यात मध्यवर्ती ठिकाणी भीषण आग 

परिसरातील नागरिकांना काढले घराबाहेर ः सुदैवाने जीवितहानी टळली

मखरेंची तत्परता आली कामी
आग लागली, त्यावेळी घटनास्थळी स्थानिक एकही नगरसेवक नव्हता. घटनेची माहिती समजताच दुसऱ्या प्रभागातील नगरसेवक सतीश मखरे हे घटनास्थळी स्वतः अग्निशमन घेऊन आले. प्रभागाचा विचार न करता सर्व आग विझेपर्यंत मखरे स्वतः घटनास्थळी थांबले. मखरे यांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.

श्रीगोंदा – शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. चहुबाजूने असलेल्या घरातील सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाने ही आग आटोक्‍यात आणून विझविली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेशेजारी एक मोठी जागा मोकळी जागा आहे. या जागेच्या चहूबाजूंनी दाट लोकवस्ती असून, आज दुपारी अचानक याठिकाणी आग सुरू झाली. परिसरातील नागरिकांनी जीव मुठीत घेऊन घरातून पळ काढला. घरातील गॅस टाक्‍या बाहेर काढल्या. ज्या ठिकाणी आग लागली तेथे सुकलेली झाडे, वाळलेले सरपण जास्त प्रमाणत असल्याने आगीने भीषण रूप घेतले.संबंधित ठिकाणावरून गेलेल्या विद्युत वाहक तारादेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अग्निशमन बंबाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्‍यात आणून शर्थीच्या प्रयत्नानंतर विझविण्यात यश आले. या अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांची धावपळ उडाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.