इंदोरच्या हॉटेलला भीषण आग

इंदौर – मध्य प्रदेशातील इंदूरमधील विजय नगर परिसरातील गोल्डन गेट हॉटेलमध्ये आज भीषण आग लागली. अग्निशामक दल त्वरित घटनास्थळी पाठविण्यात आले आणि ही आग थोड्याच वेळात विझविण्यात आली. आग लागल्यावर चार मजल्यांच्या या हॉटेलमध्ये अनेक लोक होते. आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी सर्वांना सुखरूप बाहेर काढले. खबरदारी म्हणून, जवळच्या इमारतीतील लोकांनाही बाहेर काढण्यात आले.

आगीच्य ज्वाळा हॉटेलच्या चार मजल्यांपर्यंत वेगाने पसरल्या आणि धुरामुळे संपूर्ण परिसर व्यापून गेला होता.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलच्या अंतर्गत भागात पसरलेल्या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

आतापर्यंत कोणतीही जीवितहानीचे वृत्त नाही, असे पालिकेचे उपायुक्त महेंद्रसिंग चौहान यांनी सांगितले. हॉटेलमध्ये 25 खोल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.