राजस्थान, मध्यप्रदेशसह विदर्भात आणखी तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार

नवी दिल्ली – गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसानंतर आता पुन्हा उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील तीन दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होऊन उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यासह महाराष्ट्रातल्या विदर्भात आणखी तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

महाराष्ट्रात यंदा सर्वच ठिकाणी उन्हाचा पारा 40 च्या वर पोहचला होता. सगळ्यात जास्त उष्मा हा विदर्भात जाणवला. जूनचा पहिला आठवडा संपला तरी हा उष्मा पुढील तीन दिवस असाच विदर्भात राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राजस्थानमधील ढोलपूर येथे आज पारा हा 43 अंशावर जाऊन पोहचला आहे.

दरम्यान, मान्सून शनिवारीच केरळात दाखल झाला आहे. त्यानंतर तो हवामानाच्या स्थितीनुसार देशभर पसरणार आहे. तोपर्यंत सगळ्यांनाच त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.