हृदयद्रावक! “माझा लेक गेला मग मी जगून काय करू”; मुलाच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी आईचा मृत्यू

कन्नड : राज्यात सध्या करोनची दुसरी लाट ओसरत आहे. या लाटेत सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसला असल्याचे दिसले. मात्र आता  मराठवाड्यात करोनाची परिस्थितीत आटोक्यात येत असली तरी  मृत्यूची संख्या काही कमी होताना दिसत नाही.  दरम्यान, पोटचा तरुण आणि घरातला कर्त्या मुलाचे निधन झाल्याची बातमी आईला समजताच तिनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक  घटना औरंगाबादमधील कन्नड तालुक्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील औराळा इथे शुक्रवारीही दुर्दैवी घटना घडली. अनिल तोताराम मिसाळ यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांना तातडीने गंगापूर येथील लासूर स्टेशनजवळ आमदार प्रशांत बंब यांनी उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

मुलाला कोरोनाची लागण झाल्यामुळे घरातील सर्वजण चिंतातूर होते. त्यातच आई भागिरथीबाई यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी याच कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मुलावर आणि आईवर एकाच कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान, अनिल मिसाळ यांची तब्येत अचानक बिघडली आणि उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. याविषयीची माहिती एक वर्तमानपत्राने दिली आहे.

भागिरथीबाई आपल्या मुलासह कोविड सेंटरमध्ये एकत्र असल्यामुळे लेकराची त्या काळजी घेत होत्या. तब्येतीबद्दल विचारपूस करत होत्या. पण 10 ते 12 तास उलटले तरी आपल्या मुलाबद्दल कुणी काही सांगत नव्हतं. त्यामुळे त्यांना मुलाबद्दल चिंता लागून होती. त्यांनी उपस्थितीत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता मुलांचे निधन झाल्याचे त्यांना कळले.

पला लेक आता जगात नाही, हे एकूण भागिरथीबाई यांना धक्का बसला. मुलाच्या मृत्यूमुळे त्या अस्वस्थ झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी भागिरथीबाई यांनीही मुलाच्या विरहामुळे कोविड सेंटरमध्येच प्राण सोडले. एकाच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असताना आई आणि मुलाच्या निधनामुळे मिसाळ कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. आई आणि मुलावर सोबतच अंत्यसंस्कार करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.