चाईबासा : झारखंडच्या चाईबासा येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. खिशातून १ रुपयाचे नाणे काढल्याने संतापलेल्या बापाने पोटच्या मुलाला निर्घृण शिक्षा दिली आहे. निर्दयी बापाने स्वतःच्याच मुलाचे हात उकळत्या पाण्यात बुडवले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे या मुलाचे दोन्ही हात भाजले. अडीच महिन्यांच्या उपचारानंतर आता मुलाच्या दोन्ही हाताची सर्व बोटं कापण्याची दुर्देवी वेळ आली आहे.
चाईबासा येथील चिंता बोईपाई यांनी त्यांच्या १० वर्षाचा मुलगा बुधराम याला १ रुपयाचा चोरण्याची शिक्षा दिली आहे. मुलाचे दोन्ही हात उकळत्या पाण्यात टाकले. त्यानंतर या मुलावर उपचार करण्यात आले. परंतु काही काळानंतर दोन्ही हाताच्या बोटांना एलर्जी होण्यास सुरुवात झाली. अशावेळी रांचीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये बुधराम याच्या दोन्ही हाताची सर्व बोटं कापावी लागली. जेणेकरून त्याचा हात वाचवू शकतो.
या घटनेनंतर बुधरामचे वडील फरार झाले होते. परंतु दारुच्या व्यसनामुळे १७ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. चिंता बोइपाई यांनी दोन लग्न केली होती. पहिल्या पत्नीपासून त्यांना ५ मुलं आहेत तर दुसऱ्या पत्नीपासून त्यांना ३ मुलं आहेत. बुधराम हा दुसऱ्या पत्नीचा मोठा मुलगा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधराम हा खूप भूकेला होता. त्यासाठी दुकानातून काही आणण्यासाठी त्याने १ रुपया घेतला होता. परंतु चिंता बोइपाई यांना ही गोष्ट कळताच त्यांचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्यांनी मुलाला बेदम मारले. इतक्यावरच चिंता थांबला नाही तर त्याने उकळलेल्या पाण्यात मुलाचा हात बुडवला. मुलगा आक्रोश करू लागला परंतु त्याला दया आली नाही. मुलाचा आवाज ऐकताच जेव्हा आई बाहेर आली तेव्हा तिने मुलाला वाचवले. तात्काळ तिने मुलाला रुगालयात दाखल केले. दरम्यान, आता अडीच महिन्यानंतर मुलाच्या बोटांमध्ये ऍलर्जी झाल्यामुळे त्याची सर्व बोटे कापण्यात आली आहेत.