मुंबई – अभिनेत्री आलिया भट्ट बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. कोरोनाच्या काळात, जिथे अनेक स्टार्स हिट चित्रपट देण्याचे स्वप्न पाहत होते, तिथे आलियाने सलग चार हिट चित्रपट देऊन 2022 ची क्वीनचा किताब पटकावला. बॉलिवूडवर राज्य केल्यानंतर आता आलिया भट्ट हॉलिवूडवरही अधिराज्य गाजवण्याच्या तयारीत आहे.
View this post on Instagram
आलिया भट्ट हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आलियाच्या हॉलिवूड डेब्यू चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. काही तासांतच तिची पोस्ट व्हायरल झाली. चाहत्यांनी आलियाचा लूक आणि अभिनय सुपरहिट असल्याचे सांगितले आहे.
‘हार्ट ऑफ स्टोन’च्या फर्स्ट लूकमध्ये आलिया भट्ट अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांची दमदार शैलीही पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
आलिया भट्टचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ पुढील वर्षी 2023 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आलियाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आलियाला पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक दिसत आहेत.
हार्ट ऑफ स्टोनच्या फर्स्ट लूकमध्ये अॅक्शन सीक्वेन्स आणि पडद्यामागची झलकही पाहायला मिळाली आहे. चित्रपटाचा व्हिडीओ अॅक्शनने भरलेला आणि थ्रिलने भरलेला आहे. तिचा फर्स्ट लूक उघड करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले,’हार्ट ऑफ स्टोनचा फर्स्ट लुक रिवील झाले आहे. आलियाच्या कॅप्शनवरून हे स्पष्ट होते की या चित्रपटात तिचे नाव की धवन आहे.’
View this post on Instagram
आलिया भट्टच्या या व्हिडिओवर चाहते आणि सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. आलियाची आई सोनी राजदानने कॅप्शनमध्ये लिहिले,’अरे फॅब… हे खूप रोमांचक दिसते आहे. त्याचबरोबर आलिया भट्टच्या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहून अर्जुन कपूरला अभिमान वाटत आहे.’