Heart disease । आजकालच्या राहणीमान आणि खानपानाच्या पद्धतीचे विपरीत परिणाम सर्वांवर होताना दिसून येत आहेत . त्यातून नको असणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत . बीड जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. याघटनेत एका 24 वर्षाच्या तरुण मुलाला परीक्षा देत असताना अचानक हृदयविकाराचा जोरदार झटका आला आहे. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
परीक्षा देत असतानाच हृदयविकाराचा झटका Heart disease ।
प्राप्त माहितीनुसार बीडमध्ये परीक्षा देत असताना एका 24 वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धार्थ मासाळ असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पदवीच्या पहिल्या वर्षाची परीक्षा देत होता. के एस के महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
रक्तपुरवठा करणाऱ्या नसांत गाठी Heart disease ।
या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये गाठी तयार झाल्याने त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे.
परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीत राहायचा
दरम्यान सिद्धार्थ मासाळ भूम तालुक्यातील डुक्करवाडी येथील रहिवासी असून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. परीक्षेची तयारी करण्यासाठी तो दिल्लीला राहत असे.परीक्षा देण्यासाठी तो बीडमध्ये आला होता. मात्र परीक्षा देतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
‘वन नेशन वन इलेक्शन’ देशाला पुढे घेऊन जाणारा हा निर्णय ; अनिल विज यांचे मोठे वक्तव्य