तरुणांमध्ये वाढतोय ह्रदयरोग (भाग 2)

-डाॅ. संदीप देशमुख

तरुणांमध्ये वाढतोय ह्रदयरोग (भाग 1)

हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण हे प्रौढ वयोगटात अधिक असते, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र, जगातील सर्वाधिक मृत्यूंना कारणीभूत ठरणाऱ्या या विकारांपासून तरुण वयोगटातील व्यक्तीही सुरक्षित नाहीत, याची कुणाला फारशी कल्पना नसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कठोर पावले उचलल्याशिवाय हा आकडा खाली येणे कठीण आहे. शारीरिक श्रमांना फारसा वाव न देणारी बैठी जीवनशैली ही त्यामागची मुख्य समस्या आहे. आजचा तरुण हा शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या तणावांखाली आहे. या प्रश्‍नाची उकल करायची असेल आणि हृदयविकाराच्या झटक्‍याला अकाली आमंत्रण देणे टाळायचे असेल तर जीवनशैलीमध्ये मोठे बदल करायला हवेत.

जंक फूड किंवा निकस आहाराऐवजी सकस आहारावर अधिक भर द्यायला हवा. हा अगदी सोपा आणि खूप परिणामकारक उपाय आहे. आपले वेळापत्रक कितीही दगदगीचे असले तरीही आपल्या जगण्याची नीट घडी बसविण्याचा, योग्य प्राधान्यक्रम निवडण्याचा प्रयत्न करायला हवा व संतुलित जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करायला हवा. योगा, नृत्य किंवा व्यायामाचा आणखी कोणताही प्रकार जो तुम्हाला शारीरिकदृष्टया आणि मानसिकदृष्टया निरोगी ठेवण्यास मदत करेल, तो आपल्या जीवनशैलीत जरूर समाविष्ट करा.

काय आहे संशोधन?

गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या अभ्यासांनुसार आणि सर्वेक्षणांनुसार हृदयरोहिणीचा हृदयविकार होण्यासाठी अतिरक्‍तदाब हे सर्वाधिक प्रमाणात आढळणारे कारण आहे. हृदयविकार असलेल्या 100 पुरुषांमध्ये अतिरक्‍तदाब असलेल्या पुरुषांचे प्रमाण 25.9% असते तर हृदयविकार असलेल्या 100 महिलांपैकी 24.8% महिलांना अतिरक्‍तदाब असतो.

पुरुषांना असलेल्या हृदयविकारासाठी धूम्रपान हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रमाणात आढळणारे कारण असून त्याचे प्रमाण 22.8% आहे, पण महिलांसाठी मात्र अतिरक्‍तदाब हेच हृदयविकारांमागील प्रमुख कारण आहे. ही आकडेवारी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवर आधारित आहे. ताणतणाव वाढल्यामुळे अतिरक्‍तदाब उद्‌भवतो. प्रत्येक तणावपूर्ण परिस्थितीमुळे त्या व्यक्तीचे शारीरिक वय हे प्रत्यक्ष वयापेक्षा वाढत असते. त्यामुळे तरुण वयात हृदयरोहिणीचा
विकार होतो.

सध्याची बैठी जीवनशैली आणि त्यात ताणाची पडलेली भर यामुळे तरुणांना हृदयरोहिणीचा विकार होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. दोन प्रकारचे ताण असतात, अल्पकालिक आणि दीर्घकालीन स्वरूपाचा ताण. जे आपल्या वयाच्या तिशीत आहेत, दीर्घ काळ तणावाखाली आहेत, ज्यांची बैठी जीवनशैली आहे, अशांना भविष्यात हृदयरोहिणीचा विकार होऊ शकतो. हृदयविकार होण्यासाठी विविध घटक कारणीभूत ठरतात. वाहन चालवताना, प्रवास करताना किंवा दैनंदिन क्रिया पार पाडताना येणाऱ्या ताणाचे व्यवस्थापन करणे शक्‍य असते.

तरुणांना येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्‍याचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी अतिरक्‍तदाब किंवा मधुमेह नसूनही त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. यासाठी मुख्य कारण म्हणजे मानसिक ताण आणि अपूर्ण झोप. वाढलेल्या मानसिक तणावामुळे तरुणांना हृदयविकारांना सामोरे जावे लागत असल्याची इतरही प्रकरणे समोर आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)