हृदयरोग टाळण्यासाठी व्यसनांपासून दूरच रहा… (भाग 1)

-डाॅ. एस.एल.शहाणे

दररोज हजारो लोक हार्टऍटॅकने मरतात. त्यामुळे हृदयाची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने आपले हृदय निरोगी ठेवण्याच्या काही टीप्स..

हृदयरोग टाळण्यासाठी, खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी. अधिक तळलेले अन्न, तूप, लोणी, मीठ, मिरपूड आणि मिठाळी खाण्याने शरीरात कॅलरीज, कोलेस्ट्रॉल आणि चरबी वाढते. दर महिन्याला तेलदेखील बदला. एका महिन्यात मोहरीचे तेल आणि तर दुसऱ्या महिन्यात ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

होमोसिस्टीन एक अमिनो ऍसिड आहे, जो प्रथिनांच्या पचनानंतरही शिल्लक राहतो. कोलेस्टेरॉलची पातळी वाढवून हृदयरोगाचा धोका वाढवतो. हे नियंत्रणात ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 6, फॉलीक ऍसिड आणि व्हिटॅमिन सी घ्या.
30 वर्षानंतर रक्तदाबाची नियमितपणे तपासणी केली पाहिजे. लठ्ठपणा असलेल्यांनी अशावेळी स्वत: ची काळजी घेणे आवश्‍यक आहे. हार्ट अटॅक शी संबंधित रुग्णांनाही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

सध्याच्या युगात अल्कोहॉल हे फॅशन मानले जाते. परंतु धूम्रपान आणि दारू पिण्याच्या सवयीमुळे हृदयाला नुकसान पोहोचते. हे टाळण्यासाठी आपण जीवन हे नशामुक्त आणि औषधमुक्त असणे आवश्‍यक आहे.

तुम्ही जर हृदय विकाराचे रुग्ण असाल तर तुमच्यासाठी योगा करणे फायद्याचे ठरेल. आपण कमीत कमी अर्धा तास योग करू शकता. हे कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, तणाव यासह अनेक समस्या काढून टाकते. तसेच, रक्ताभिसरण देखील चांगले राखण्यास मदत करते.

आजकाल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखाद्या विशिष्ट वयानंतर होऊ शकते असे राहिले नाही. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्‍यामुळे निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल 32% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. त्यामुळे असे दिवस साजरे करून हृदयरोगाविषयी जनजागृती करणे, हृदयरोग होऊ नये अथवा झाल्यास काय उपाययोजना करावी याची माहिती जनतेपुढे मांडणे महत्त्वाचे ठरते.

इतर कुणापेक्षाही व्यसन करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक असते. त्यासाठी तंबाकू, धूम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहणे कधीही चांगले. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे ह्यागोष्टी ताबडतोब बंद करायला हवे.

हृदयरोग टाळण्यासाठी व्यसनांपासून दूरच रहा… (भाग 2)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)