हृदयाचे स्नायू बळकट हवेत (भाग 3)

-डाॅ. मानली गुप्ता-पाटील

मी माझ्या मित्रपरिवारासह पुण्याजवळच एका शांत ठिकाणी आले होते. रोजच्या कामाच्या गडबडीतून असा स्वतःसाठी आणि आप्तेष्टांसाठी वेळ काढल्यामुळे खरंच खूप छान वाटत होते. ताजी-स्वच्छ हवा, गवतावर चमचमणारे दवबिंदू, ओल्या मातीचा सुगंध, टवटवीत फुले आणि पक्ष्यांची किलबिल… सगळेच वातावरण अगदी अल्हाददायक होते! माझ्या मनात विचार आला, असेच वातावरण कायम आपल्या भोवती असते तर? आपल्याला ना डॉक्‍टरांची गरज पडली असती ना ही गोळ्या-औषधांची! कायम आनंदी आणि निरामय राहिलो असतो आपण कदाचित!!

मधुमेह झालेल्यांसाठी कार्निटीनचा कितपत फायदा होतो?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी नि:संदिग्धपणे सांगितले, कार्निटीनमुळे इन्शुलिन अधिक चांगल्या प्रकारे वापरले जाते आणि रक्तशर्करा नियंत्रणात रहाण्यास मदत होते. ज्यांना डायबेटीक न्यूरोपॅथी आहे (ज्यांचे मज्जातंतू मधुमेहामुळे कमकुवत झाले आहेत) अशांसाठी कार्निटीन संरक्षक ठरते.

याचाच अर्थ की ज्यांना उच्चरक्तदाब आहे, हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे आणि मधुमेह आहे अशांसाठी कार्निटीन उपयोगी आहे. पण कार्निटीनचे सप्लिमेंट देताना कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत आणि कोणत्याही औषधांच्या कामामध्ये अडथळा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

आहारामध्ये कार्निटीनयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे. मांसाहारी पदार्थ, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ यात कार्निटीन सर्वाधिक प्रमाणात असते तर केळी, भात, घेवडा, मका आणि संत्र्यांमध्ये काही प्रमाणात असते. या नैसर्गिक स्त्रोतांमधील कार्निटीन शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाते.

सारांश असा आहे…

-शरीरात कमतरता असल्याशिवाय कार्निटीनचे सप्लिमेंट घेण्याची आवश्‍यकता नाही. फार थोड्यांमध्ये ही कमतरता आढळते.
-कार्निटीनची ‘जीवनसत्व ब 7’ अशी चुकीची जाहिरात केली जाते.
-कार्निटीन हे एक प्रकारचे प्रथिन (अमिनो आम्ल) असून ते आपल्या आहारातून (मांसाहारी पदार्थ, दूध) मिळू शकते.
-कार्निटीन मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि चरबी वापरली जाण्यासाठी उपयुक्त ठरते पण वजन कमी करण्यासाठी त्याचा काही विशेष फायदा होत नाही.
-डायलिसिसवर असणाऱ्यांना कार्निटीनचा फायदा होतो.
-रक्तवाहिन्यांना मजबुती आणण्यासाठी कार्निटीनचा उपयोग होतो पण ते वापरताना काळजी घ्यायला हवी.
-कार्निटीनमुळे इन्शुलिन अधिक चांगल्या प्रकारे वापरले जाऊन मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
-हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे अशा व्यक्तींसाठी कार्निटीन उपयुक्त ठरते.
-कार्निटीनमुळे पुरुषांची पुनरुत्पादन क्षमता सुधारण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.
-त्यांचे बोलणे ऐकून मी समाधानाने मान हलवली!

हृदयाचे स्नायू बळकट हवेत (भाग 1)  हृदयाचे स्नायू बळकट हवेत (भाग 2)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)