हृदयाचे स्नायू बळकट हवेत (भाग 1)

-डाॅ. मानली गुप्ता-पाटील

मी माझ्या मित्रपरिवारासह पुण्याजवळच एका शांत ठिकाणी आले होते. रोजच्या कामाच्या गडबडीतून असा स्वतःसाठी आणि आप्तेष्टांसाठी वेळ काढल्यामुळे खरंच खूप छान वाटत होते. ताजी-स्वच्छ हवा, गवतावर चमचमणारे दवबिंदू, ओल्या मातीचा सुगंध, टवटवीत फुले आणि पक्ष्यांची किलबिल… सगळेच वातावरण अगदी अल्हाददायक होते! माझ्या मनात विचार आला, असेच वातावरण कायम आपल्या भोवती असते तर? आपल्याला ना डॉक्‍टरांची गरज पडली असती ना ही गोळ्या-औषधांची! कायम आनंदी आणि निरामय राहिलो असतो आपण कदाचित!!

माझ्या शेजारच्याच खुर्चीत बसलेल्या माझ्या हृदयविकारतज्ज्ञ मित्राकडे – डॉ. गुप्तांकडे मी वळून पाहिले. नेहमीप्रमाणे ते मला काहीतरी विचारण्याच्या तयारीतच होते! कार्निटीन सप्लिमेंट्‌सबद्दल तुम्हाला काय वाटते? लक्षात आहे ना, तेच कार्निटीन (अमिनो आम्ल) जे आपल्या यकृतात आणि मूत्रपिंडात लायसिन व मिथिओनिनपासून तयार होते. कार्निटीनचे सप्लिमेंट आपले यकृत, मेंदू, स्नायू, हृदय आणि पुरुषांमध्ये तर शूक्राणूंमध्ये देखील साठविले जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हल्ली सप्लिमेंट्‌सच्या सुळसुळाटाच्या पार्श्वभूमीवर मला कुठेतरी वाचलेले आठवले- ‘काही सप्लिमेंटस्‌ चांगली असतात, काही वाईट असतात तर काही कोणताच परिणाम न करणारी असतात! आपणच विचारपूर्वक ठरवायला हवे की कोणती सप्लिमेंट्‌स किती प्रमाणात वापरायची ते!’

L-carnitine, cetyl-carnitne(LCR), L-carnitne L-Tartrate (LCLT) आणि Propoinyl-L-Carnitine (GPLC) हे कार्निटीन सप्लिमेंटस्‌चे नेहमी वापरले जाणारे प्रकार. LCR  बौद्धिक व आकलनक्षमता वाढविण्यासाठी वापरले जाते, LCLT शारीरिक क्षमता आणि ताकद वाढविण्यासाठी वापरतात, तर GPLC रक्ताभिसरणातील काही समस्या तसेच पायाच्या स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी वापरण्यात येते.

कार्निटीनचे महत्त्व काय आहे?

लोकांना वाटते की कार्निटीन चरबी (फॅटस्‌) जाळायला मदत करते!
मला एका संशोधनाबद्दल वाचलेले आठवले – कार्निटीन हे आपल्या पेशींमधील तंतूकणिकांचे (mitochondria – शरीरातील ऊर्जानिर्मिती केंद्रे) कार्य उंचावते आणि अधिक ऊर्जा खर्च करण्यास मदत करते. तार्किकदृष्ट्या हे बरोबर असले तरी याबाबतीत अभ्यास व्हायला हवा. मेंदूची कार्यक्षमता आणि सावधानता वाढवण्यास कार्निटीन खचितच मदत करते पण चरबी जाळण्याबाबतीत पुरेशा संशोधनाआभावी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे अवघड आहे. अर्धवट माहितीमधून बऱ्याचदा कार्निटीनची ‘जीवनसत्व ब 7’ म्हणून जाहिरात केली जाते, पण कार्निटीन हे जीवनसत्व नाही.

हृदयाचे स्नायू बळकट हवेत (भाग 2)     हृदयाचे स्नायू बळकट हवेत (भाग 3)  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)