रॉर्बट वढेरांच्या याचिकेवर आज सुनावणी

नवी दिल्ली – मनिलॉंड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वढेरा यांना मिळालेला जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सक्‍त वसुली विभागाने म्हणजेच ईडीने केली आहे. या याचिकेवर उद्या, सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वढेरा हे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेव्हणे आहेत.

दिल्लीच्या ट्रायल कोर्टाने त्यांना 1 एप्रिल रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यांना देण्यात आलेल्या अटकपूर्व जामिनाचा तपासकामांवर विपरीत परिणाम होत आहे, असे ईडीने न्यायालयात सांगितले होते. तसेच तपास कार्यात वढेरा सहकार्य करत नसल्याचा आरोपही केला होता. वढेरा यांच्या बरोबरच ईडीने त्यांचे निकटवर्ती मनोज अरोरा यांचा जामीन अर्जही रद्द करण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.